परभणी (प्रतिनिधी) – मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यावर सतत अन्याय करणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग यावी तसेच परभणी- मनमाड मार्गावरील अजूनही सुरू न केलेल्या सहा रेल्वे तात्काळ सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरूवारी (दि. 25 नोव्हेंबर 2021 )सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे ने सतत मराठवाडयातील प्रवाश्यावर अन्याय केला आहे. प्रकल्प पूर्ण करणे असो की नवीन रेल्वे सुरू करणे याकडे दुर्लक्ष केले आहे. लाॅकडाऊन नंतर परभणी-मनमाड मार्गावरील अद्यापही सात गाड्या सुरू केल्या नाहीत, याबाबत प्रवासी महासंघाने आवाज उठवला. आंदोलनाची धमकी दिल्यानंतर काल नांदेड-मनमाड सुरू करण्याची घोषणा केली परंतु अजूनही सहा गाड्या बंद आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना जाग यावी म्हणून उद्या घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
गुरूवारी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्थानकावर घंटानाद आणि निदेर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राजेंद्र मुंढे, रितेश जैन कदिरलाला हाश्मी, बाळासाहेब देशमुख, प्रवीण थानवी, डॉ राजगोपाल कलानी, श्रीकांत गडापा , वसंत लंगोटे, रवींद्र मुथा, दयानंद दीक्षित आदींनी केले आहे.