महिला सरपंचाच्या घरात सापडले ‘घबाड’; दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम

सरपंचांच्या घरामध्ये एकूण ११ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली

भोपाळ : राजकारण्यांनी कोट्यवधीची बेहिशोबी मालमत्ता  साठवूं ठेवणे हे काही आता नवीन राहले नाही. अशा प्रकरणामध्ये दिल्लीपासून गल्ली पर्यंतच्या राजकारण्यांचा समावेश होतो. याच प्रकरणात आता मध्य प्रदेशमधील एका गावातील महिला सरपंचाकडे सापडलेली संपत्ती पाहून छापा टाकण्यासाठी आलेल्या तपास अधिकाऱ्यांनाही  घाम फुटला आहे.

रीवा जिल्ह्यातील बैजनाथ गावातील महिला सरपंचाकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ती सापडली. एवढेच नाही तर या सरपंचानी घरात स्वीमिंगपूलही बांधले होते. लोकायुक्तांनी जेव्हा छापा मारला तेव्हा घरामध्ये हायवा ट्रकसह ३० वाहने सापडली. घरात सापडलेल्या दागदागिन्यांची मोजदात करता करता अधिकारी थकले.

काल पहाटे लोकायुक्त, पोलिसांच्या पथकाने बैजनाथ गावातील महिला सरपंच सुभा जीवेंद्र सिंह गहरवार यांच्या घरावर धाड घातली. तेव्हा गावात खळबळ उडाली. बचाव पथकसुद्धा सरपंचांचं वैभव पाहून थक्क झाले. सरपंचांच्या घरामध्ये एकूण ११ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली. घरामध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागदागिने, २६ भूखंड आमि ३० अवजड वाहने सापडली. तसेच कोट्यवधींचे घर आणि घरामध्ये स्विमिंग पूलसुद्धा तपास पथकाच्या नजरेस पडले.

लोकायुक्त पोलिसांच्या पथकाने कागदपत्रांची छाननी करत सरपंचांच्या घरामधून ३० अवजड वाहने जप्त केली. यामध्ये चेवन माऊंटेन, जेसीबी मशीन, हायवा ट्रक, डंपर, लोडर मशीन, पाण्याचे टँकर, स्कॉर्पिओ आणि बोलेरोसह अन्य वाहनांचा समावेश आहे. याशिवाय एक एक एकर परिसरात पसरलेल्या सरपंचांच्या दोन कोट्यवधी रुपयांच्या दोन घरांचीही माहिती मिळाली. तसेच त्यामध्ये एक स्विमिंग पुलही सापडले. तसेच २० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिनेही पोलिसांच्या हाती लागले. सरपंच सुभा जीवेंद्र सिंह गहरवार यांच्या तब्बल ३६ भूखंडांची माहिती मिळाली. त्यापैकी १२ भूखंडांची नोंद मिळाली आहे. उर्वरीत भूखंडांची माहिती मिळवली जात आहे.

याशिवाय या महिला सरपंचांच्या एका अॅग्रीकल्चरल प्लॉटचीही माहिती मिळाली आहे. यामधील अनेकांची नोंदणीही झालेली नाही. लोकायुक्त पोलिसांच्या कारवाईमध्ये आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या बेनामी मालमत्तेची माहिती मिळाली आहे. काल संध्याकाळपर्यंत लोकायुक्तांच्या पथकाची कारवाई सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात अजून मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.

महिला सरपंचांविरोधात लोकायुक्त पोलिसांना मिळकतीपेक्षा अधिक उत्पन्नाची माहिती मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्त पोलिसांच्या पथकाने न्यायालयामधून सर्च वॉरंट काढून त्यांच्या घरावर पहाटे ४ वाजता धाड टाकली होती. तेव्हा सरपंचांच्या घरात ११ कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.