लस घ्या आणि ठेवीवर मिळवा अधिक व्याज; वाचा नेमकी काय आहे योजना…

नवी दिल्ली – देशात सध्या करोनावरील लसीकरणाची मोहीम वेगात चालू आहे. लसीकरणाला चालना मिळावी याकरिता सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने ज्या नागरिकांनी लस घेतली आहे अशासाठी ठेवीची एक नवी योजना जाहीर केली आहे. या ठेवीवर नियमित ठेवीपेक्षा अधिक व्याज मिळणार असल्याचे सेंट्रल बॅंकेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.

बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार लसीकरण केलेल्या नागरिकासाठी ईम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम सुरु केली आहे. या ठेवीचा कालावधी 1,111 दिवसाचा आहे. लस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या ठेवीवर नियमित ठेवीवरील व्याजदरापेक्षा 0.25 टक्के अधिक व्याज मिळणार आहे.

त्याचबरोबर लस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांनी या योजनेत ठेवी ठेवल्यानंतर त्यांना0.50 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असल्याचे सेंट्रल बॅंकेने म्हटले आहे. मात्र या मर्यादेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

बॅंकेने म्हटले आहे की, लसीकरण मोहिमेला वेग मिळावा यासाठी बॅंकेने पुढाकार घेऊन ही योजना सुरु केली आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 35 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून देशात लसिकरण मोहीम चालू असून आतापर्यंत 10 कोटी 45 लाख लोकांनी लस घेतली आहे. आणखी लोकांनी पुढाकार घेऊन लस घ्यावी याकरिता आम्ही ही योजना सुरू केली आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा अशी आमची इच्छा आहे असे बॅंकेने म्हटले आहे. आगामी काळात इतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाही अशा प्रकारची योजना सुरू करण्याची शक्‍यता आहे. मात्र या योजनेला कसा प्रतिसाद मिळत आहे हे सेंट्रल बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात सांगितलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.