ड्रीमसिटी विकसित करायला द्या

डीएसकेंचा न्यायालयात प्रस्ताव

पुणे – “पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेला डीएसके ड्रीम सिटी प्रकल्प न्यायालयाने नवीन बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद नेमून पूर्ण करावा. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून 10 हजार कोटी रुपये जमा होतील. त्यातील 40 टक्के रक्कम बांधकाम व्यावसायिकाला व उर्वरित रक्कम गुंतवणूकदारांना द्यावी,’ असा प्रस्ताव बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी सोमवारी न्यायालयात दिला आहे.

“जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत नोटीस काढून ती प्रत्यक्ष विक्रीस काढण्यात मोठा वेळ जाऊ शकतो. त्यात अनेकांच्या हरकती येत शकता. त्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळण्यात उशीर होईल. त्यामुळे न्यायालयाने स्वतः एखादा बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद नियुक्त करावा. त्यांच्या माध्यमातून डीएसके ड्रीम सिटी प्रकल्प पूर्ण करून त्यांची विक्री करावी. या एका प्रकल्पातून 10 कोटी रुपये जमा होऊ शकतात,’ असा प्रस्ताव डीएसके यांनी न्यायालयास दिल्याचे त्यांचे वकील धीरज घाडगे यांनी सांगितले. यावर न्यायालयाने मालमत्ता का जप्त करू नये? अशी नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत दि.3 फेब्रुवारी रोजी आपले सविस्तर म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने सांगितले.

“डीएसके यांना गादी, पांघरून, टेबल आणि खुर्ची मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर न्यायवैद्यकीय अहवाल मिळावा यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने न्यायवैद्यकीय अहवाल देण्याचा आदेश दिला होता. या सर्व बाबींना दोन वर्ष होऊन गेल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डीएसके त्यांची पत्नी आणि मुलाला आठवड्यातून दोन वेळा दोन तास भेटू द्यावे,’ अशी विनंती देखील त्यांच्या वकिलाने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.