टोमॅटो पिकाचे रोगनियंत्रण 

स्नेहल खलाटे 
म.फु. कृ. वि. राहुरी 
टोमॅटो पिकाचे रोग नियंत्रण यशस्वी पणे केल्यास भरगोस उत्पादन होवून उत्पन्नात वाढ करता येईल मात्र त्यासाठी पिक वाढीच्यावेळी योग्य ते लक्ष देणे आवश्‍यक आहे.
1) रोपातील मर :- टोमॅटो पिकामध्ये जमिनीत वाढणान्या पीथीयम या बुरशीमुळे मर रोग होतो. टोमॅटोच्या रोपवाटिकेत बीज लागवडीनंतर दुसर्याआठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. नुकसानग्रस्त रोपाचा जमिनीलगतचा भाग मऊ पडून रोपे कलंडतात व मरतात.
रोगनियंत्रण :- रोपवाटिका उंच गादीवाफ्यावर केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीची वाढ रोखण्यास मदत होईल. तसेच मॅन्कोझेब तीन प्रेम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. एकरी लागवडीकरिता 650 ग्रॅम बियाणे वापरावे. दाट लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणे बियाणे लागवडीपासून 13 व्या व 20 व्या दिवशी वाफ्यावर ड्रेंचिंग करावी.
2) उशिरा येणारा करपा (लेट ब्लाईट) :- हा रोग फायटोप्योरा इनफेस्टन्स या बुरशीमुळे होतो. हा एक महत्त्वाचा रोग असून त्याचा उपद्रव फळांवर आढळून येतो. पानांचा रोगग्रस्त भाग हात लावल्यानंतर कोलमोडतो. संपूर्ण पान दोन ते चार दिवसांत रोगग्रस्त होते या रोगाचा प्रादुर्भाव फळांवरसुद्धा होतो. फळांवर चढे पडतातत्यामुळे अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते
रोगनियंत्रण :- या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी झायनेब एम-45 किंवा डायफोलटान यांपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी दीड ते अडीच किलो प्रति हेक्‍टर करावी. रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब 24 ग्रॅम आणि टेल्युकोनॅझोल 5 ते 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रत्येकी दोन फवारण्या कराव्यात किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 30 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटूनपालटून फवारावे. उशिरा येणारा करपा आणि फळसड रोगाच्या नियंत्रणासाठी वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्‍झी एम झेड-72 किंवा फोसेटील .एल 25 ग्रॅम प्रति 10 लि. पाणी आवश्‍यकतेनुसार आलटून पालटून फवारावीत.
3) लवकर येणारा करपा :- या रोगास उबदार दमट हवामान पोषक असते. अशा हवामानात रोगाचे प्रमाण वाढते आणि रोगाचे प्रमाण जास्त झाल्यावर पानांच्या देठांवर ठिपके आढळतात. त्यामुळे संपूर्ण झाड करपते. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 3 फ़ेम पाण्यात मिसळणारे किंवा झायरम 2 फ़ेम कॉपर ऑक्‍सिक्‍लोरराईड 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून हेक्‍टरी 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
4) मर :- जमिनीत कमी ओलावा आणि 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त प्रमाणात तापमान असल्यास या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण 50 ते 100 मि.लि. प्रत्येक झाडाच्या बुडाशी जिरवण करावे.
विषाणुजन्य (व्हायरस) रोग :- विषाणुजन्य टोमॅटोत अनेक वेगवेगळे रोग येतात; परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने पर्णगुच्छ अथवा बोकड्या व मोनॅक रोग मोठ्या प्रमाणात आढळतात
अ) पर्णगुच्छ :- या रोगामुळे पाने बारीकवाकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात पानांचा रंग फिकट हिरवा- पिवळसर होतो. यामुळे झाडांची वाढ खुटते. या विषाणुजन्य रोगाचा प्रसार पांढ्या माशीमुळे होतो.
ब) टोमॅटो मोज़ेक :- टोमॅटो मोज़ेक व्हायरस या विषाणूमुळे टोमॅटोवर मोज़ेक रोग आढळून येतो. या रोगामुळे पाने फिकट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ घंटते, फुले-फळे फार कमी होतात रोगग्रस्त बियाण्यांपासून तयार झालेल्या रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरवात होते.हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करताना स्पर्शाने आणि मावा व किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
 रोगनियंत्रण :-
1) विषाणुजन्य रोगांचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडीमार्फत होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे, हाच एक उपाय आहे
2) या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून काळजी घेणे फार जरुरीचे आहे. बियाणे पेरणीपूर्वी इमिडाक्‍लोफाड किंवा काबोंसल्फॉन पाच ग्रॅम प्रति किलो अधिक ट्रायकोडर्मा पाच फेम प्रति किलो यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.
3) पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर काबोंफ्युरान 30 ग्रॅम किंवा 25 ग्रॅम प्रति 4-5 मीटर आकाराच्या गादीवाफ्यावर मिसळावे.
4) इमिडाक्‍लो एंड 10 मि. लि. किंवा काबोंसल्फॉन 20 मि.लि. अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 फ़ेम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
5) फिप्रोनील 15 मिलि. किंवा थायमेथोक्‍झारम 4 ग्रॅम किंवा डायमेथोडएट किंवा मिथील डिमेटॉन 1010 मि.लि. प्रति लिटरपाण्यात मिसळून रोपावर फवारावे.
6) लागवडीपूर्वी 25 ते 30 दिवस अगोदर टोमॅटो लागवड क्षेत्राच्या सर्व बाजूने पाच ते सहा ओळी मका किंवा ज्वारी
पेरल्यास पांढया माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून टाकावीत
7) लागवडीनंतर मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा काबोंसल्फान 10 मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 20 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोपीड चार मिलि. प्रति 10 लिटर पाण्याच मिसळून दर15 दिवसांच्या अंतराने आलटूनपालटून फवारण्या कराव्यात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)