पुणे – खडकवासला विधानसभेतील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी केंद्र आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून वारजे माळवाडीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण केला. सोसायटयाचे जोड रस्ते, पाणी पुरवठा सुरळीत होणे, चांदणी चौकातील प्रकल्पासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर केला, यासह अनेक विकासकामांमुळे मतदार लोकसभेपेक्षा अधिक माताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
वारजे-माळवाडी, भुसारी कॉलनी, कोथरूड या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, नगरसेवक राजाभाऊ बराटे, स्वीकृत सदस्य सचिन दांगट, शैलेश मेंगडे, मनीष बराटे, दत्ता धुमाळ, वृषाली चौधरी, वासुदेव भोसले, संजय वाल्हेकर, नितीन बराटे, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर ठाकर, बाळकृष्ण वांजळे, विनायक नलावडे, मयूर वांजळे यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
ही पदयात्रा माळवाडी बसस्टॉप येथून सुरू होवून, अष्टविनायक चौक, यशोदीप चौक, चैतन्य चौक, युनिव्हर्सल, आपटे सोसायटी, पॉप्युलरनगर, अतुलनगर, आदित्य गार्डन सिटी, साईसयाजी नगर, शोभापुरम, तेजोवलय, चैतन्यनगरी श्रीराम सोसायटी, आचार्य सोसायटी, आंबेडकर चौक, तपोधाम, इंगळेनगर, आकाशनगर या परिसरात झाली.