महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राला उतरती कळा

नगर –  महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे स्पर्धा परीक्षा केंद्राला उतरती कळा लागली आहे. मनपाच्या टक्केवारी कारभाराला नागरिक अक्षरश: कंटाळलेले असल्याचा आरोप भैरवनाथ वाकळे यांनी केला आहे.

तसेच मनपा प्रशासन नागरिकांना सोयीसुविधा देण्यास असमर्थ ठरलेली आहे. शासनाकडून कोट्यवधी रूपयांचे निधी येऊनही नागरिकांना सुविधा मिळत नाही. मनपाने बंद पडलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्वरित सुरू करून शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा. अशी ही मागणी करण्यात आली आहे.

तसेच केंद्र संचालक प्रमुखाची त्वरीत नियुक्ती करणे, विद्यार्थ्यांना वाचनालयासाठी नवीन अद्यायावत अभ्यासक्रमाची पुस्तके त्वरित उपलब्ध करून द्यावेत. गेस्ट लेक्‍चर्स त्वरित सुरू करावे, तळघरातील अभ्यासिकांसाठी बेंच व इतर सोयीसुविधा व संपूर्ण अभ्यास केंद्राची स्वच्छता व निर्जंतुकरण करणे, वाचनालयाच्या कपाटांची संख्या वाढविणे, बंद पडलेल्या लाइट त्वरित दुरूस्त करून सुरू करावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.