बर्लिन : जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केला होता. त्यांनी युक्रेनशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन पुतीन यांना केले. गेल्या सुमारे दोन वर्षांतील हा त्यांचा पहिला संवाद होता. तासभर चाललेल्या फोन संभाषणात, स्कोल्झ यांनी युक्रेनमधून रशियन सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले आणि युक्रेनला जर्मनीच्या सतत समर्थन कायम राहील अशीही पुष्टी केली.
युक्रेनच्या विरोधात उत्तर कोरियाच्या सैन्याची तैनाती ही एक गंभीर समस्या असल्याचे नमूद करत स्कोल्झ म्हणाले की यामुळे संघर्षात वाढच होईल. दरम्यान, युक्रेनसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी केल्या जाणाऱ्या संभाव्य करारांमध्ये रशियाचे सुरक्षा हित लक्षात घेतले पाहिजे. ते नवीन प्रादेशिक वास्तवांवर आधारित असले पाहिजे आणि संघर्षाच्या मूळ कारणांना त्यात संबोधित केले पाहिजे असे पुतीन यांनी स्कोल्झ यांना सांगितले. पुतिन यांनी बर्लिनला ऊर्जा कराराचा प्रस्तावही दिला.
युक्रेनला शस्त्रास्त्रांचा तुटवडा जाणवत असताना आणि रशियाचे सैन्य सातत्याने पुढे जात असताना जर्मनीच्या चॅन्सेलरनी हे युध्द संपवण्याचे आवाहन केले आहे. न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्राप्त करण्याच्या उद्देशाने वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी रशियाला केले. जर्मनी हा युक्रेनचा सर्वात मोठा आर्थिक सहाय्यक आणि अमेरिकेनंतर सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार आहे.
दरम्यान, स्कोल्झ यांनी एका मुलाखतीत सांगितले की युक्रेनमधील युद्ध ही जर्मनीसाठी आर्थिक आणीबाणी आहे. युद्धाच्या प्रारंभी हा संघर्ष किती काळ चालेल हे माहित नव्हते. कर्जाच्या नियमात बदल करण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, तेव्हा घेतलेला चुकीचा निर्णय आज आपल्याला योग्य काम करण्यापासून रोखत नाही.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जर्मनीच्या चॅन्सेलरना पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला. एकाकी पडलेल्या रशियन नेत्याला या चर्चेमुळे फायदाच होईल आणि युद्ध लांबणीवर जाईल. पुतिन यांना खरी शांतता नको आहे असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ताज्या बातमीनुसार रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदरावर हवाई हल्ला केला आहे.
या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. यादरम्यान बहुमजली इमारत आणि हीटिंग सिस्टमचे नुकसान झाले. उबदार वातावरण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पाइपलाइन खराब झाल्याने 40 हजार लोकांना थंडीत जगावे लागले. शहरातील एका प्रसूती रुग्णालयाची हीटिंग सिस्टम देखील खराब झाली आहे.