नवी दिल्ली – दिल्लीतील आप सरकारने देशाच्या राजधानीतील रस्ते जागतिक दर्जाचे बनवण्याचा निश्चय केला आहे. आता दिल्लीचे रस्ते चकाचक करण्यासाठी ते सरकार जर्मनीच्या तज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची जर्मनीचे राजदूत फिलिप ऍकरमन यांनी भेट घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी जर्मनीची मदत घेण्याचे संकेत दिले.
I had a great exchange with Delhi CM @ArvindKejriwal and Deputy CM @msisodia on governance in Delhi, including the Delhi school system and opportunities for cooperation on infrastructure development, waste management and energy. pic.twitter.com/IaOowTIj8V
— Dr Philipp Ackermann (@AmbAckermann) October 12, 2022
केजरीवाल, सिसोदिया यांनी ऍकरमन यांच्याशी पायाभूत सुविधांचा विकास, ऊर्जा, प्रदूषण आदी मुद्द्यांवर चर्चा केली. सरकारी शाळा आणि रूग्णालयांमध्ये घडवलेल्या आमूलाग्र परिवर्तनाबद्दल ऍकरमन यांनी आप सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. त्या सरकारने आता रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सूचित होत आहे.