बर्लिन – चॅम्पियन्स लीग मूळ वेळापत्रकानुसार इस्तंबुलमध्ये होणार होती. मात्र, त्यांचे यजमानपद काढून घेतले आहे. आता या स्पर्धेच्या यजमानपदासाठी सध्या जर्मनी व पोर्तुगाल यांनी उत्सुकता दाखवली आहे. याबाबतचा निर्णय येत्या 17 जून रोजी युरोपियन फुटबॉल महासंघाच्या (यूएफा) कार्यकारी समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
करोनामुळे ही स्पर्धा लांबणीवर पडली होती. तसेच इस्तंबुलकडून यजमानपद का काढून घेण्यात आले त्याचीही कारणे महासंघाने दिलेली नाहीत. मात्र, तटस्थ देशातच सामने व्हावेत असे महासंघाचे धोरण असल्याने आता या फेरीसाठी या दोन देशांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. ही फेरी येत्या ऑगस्टमध्ये होणार असून कोणाला आयोजनाची संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.