जगात भारी : जर्मनीच्या तरुणीने घेतले कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

कोल्हापूर – जर्मन मधील तरुणी कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रेमात पडली आहे. जागतिक परिषदेत कोल्हापूरच्या आपत्तीव्यवस्थापना बद्दल मांडलेली माहिती पाहून भारावून गेलेल्या तेरेसा यांनी याच्या अभ्यासासाठी थेट कोल्हापूर गाठलंय.

भौगोलिक दृष्ट्या दरी खोऱ्यांचा परिसर आणि दरवर्षी उद्भवणारी पूरस्थिती याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती पथक नेहमी सज्ज असते. तर देशात इतर ठिकाणी मिळणार नाही अशी स्थानिक स्वयंसेवी पथकांची मदत आपत्ती कालीन परिस्थितीत मिळते. त्यामुळे इतर ठिकाणच्या तुलनेत इथले काम जलद आणि तत्पर पाहायला मिळते तर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिलांचेही देशातील पाहिले पथक कोल्हापुरात तयार झाले आहे. त्यांची प्रात्यक्षिके पाहून तेरेसा भारावून गेल्या. तेरेसा ह्या जर्मन विद्यापीठात यावर खास पीएचडीसाठी प्रबंध मांडणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.