जर्मनीतील निवडणूकीत अटीतटीची लढत; अँजेला मर्केल नंतर चॅन्सेलर कोण ?

बर्लिन – जर्मनीतील सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे. चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या नंतर देशाचे नवीन चॅन्सेलकर कोण होणार हे या निवडणूकीतील निकालावर ठरणार आहे. त्यामुळे या संसदीय निवडणूकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

मर्केल यांच्या मध्यवर्ती उजव्या विचारसरणीच्या युनियन ब्लॉक आणि गव्हर्नर आर्मिन लॅसचेट यांच्यामध्ये चॅन्सेलर पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त मध्यवर्ती डाव्या विचारसरणीच्या सोशल डेमोक्रॅट प7ाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या पक्षाच्यावतीने माजी अर्थमंत्री आणि व्हाईस चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ चॅन्सेलर पदासाठी रिंगणात आहेत.

अलिकडेच झालेल्या सव्हेक्षणानुसार सोशल डेमोक्रॅट पक्षाने अधिक आगाडी घेतलेली आहे. पर्यावरणवादी ग्रीन गटाकडून ऍनालेना बासरबोक या चॅन्सेलर पदासाठी प्रथमच रिंगणात उतरल्या आहेत. मात्र जनमताच्या चाचणीतून त्या तिसऱ्या क्रमांकापेक्षाही मागे पडल्या असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.