जर्मन करंडक फुटबॉल : डर्टमंडची डॉइसबर्गवर मात

बर्लिन –ज्युड बेलिंगहॅमने पदार्पणात केलेला गोल तसेच अन्य खेळाडूंनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर बोरुसिया डर्टमंड संघाने जर्मन कप फुटबॉल स्पर्धेत एमएसव्ही डॉइसबर्ग संघाचा 5-0 असा धुव्वा उडवला.

या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर जेडन सॅंचोने 14 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वयाच्या केवळ 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करत असलेल्या ज्युड बेलिंगहॅमने 30 व्या मिनिटाला गोल केला व आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर शर्मन हजार्डने 39 व्या मिनिटाला गोल केला व संघाला पहिल्या हाफमध्येह वर्चस्व प्राप्त करून दिले.

दुसरा हाफ सुरू झाल्यावरही डर्टमंड संघाचेच वर्चस्व राहिले. त्यांच्या जिओन रेयानने 50 व्या मिनिटाला गोल केला व आक्रमक खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. सामना संपण्यापूर्वी 58 व्या मिनिटाला मार्क रेऊसनेही गोल करण्याची संधी सोडली नाही. त्याच्या गोलसह डर्टमंड संघाने हा सामना 5-0 असा सहज जिंकला व स्पर्धेत आगेकूच केली.

पेनल्टीचा कहर, बर्नमाऊथचा विजय

इंग्लिश प्रीमिअर लीगच्या बर्नमाऊथ व क्रिस्टल पॅलेस संघांतील सामन्यात पेनल्टीचा कहर झाला. मूळ वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआऊटमध्ये बर्नमाऊथने हा सामना 11-10 असा जिंकला. जागतिक फुटबॉलमधील क्‍लब स्तरावरील सामन्यात हा एक विक्रम म्हणूनच नोंदला गेला. सर्वात लांबलेला शुटआऊट असेच या सामन्याचे वर्णन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.