पुणे – जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना छत्रपती राजे प्रतिष्ठाण आणि पार्क, जागरुक नागरिक संघ यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्ती मृत्यूमुखी, तर एकूण 56 लोक गंभीर जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 आणि जखमींमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता.