वेंडेल, (अमेरिका) : बारकोडचे निर्माते जॉर्ज लाऊरेर यांचे निधन झाले, ते 94 वर्षांचे होते. अमरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामधल्या वेन्डेल इथल्या राहत्या घरी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.
इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या लाऊरेर यांनी तीन दशकांहून अधिक काळ आयबीएममध्ये काम केले आणि स्कॅनिंग आणि संगणक मेमरी डिव्हाइससाठी डझनभर पेटंट्स तयार केली. इयत्ता 11 वीत असताना त्यांनी सैन्यात भरती होऊन दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला होता. युद्धानंतर, त्यांनी रेडिओ आणि टीव्ही दुरुस्ती शिकण्यासाठी तांत्रिक शाळेत प्रवेश केला, परंतु त्याच्या शिक्षकांनी पटकन त्यांचे कौशल्य ओळखले आणि त्याऐवजी आपल्याला अभियांत्रिकीसाठी महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
1976 मध्ये त्यांना रेली (एनसी) च्या संशोधनाचा त्यावर्षाचा पुरस्कार मिळाला. लाऊरेर यांची सर्वात प्रसिद्ध निर्मिती असलेला “युपीसी’ प्रारंभी किराणा दुकानांच्या गटासाठी तयार केले गेली होती.
बारकोडचा उपयोग जगभरात विविध ठिकाणी होतो. बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल, अशा काळ्या पांढऱ्या रेषांच्या आकड्यांचा संच असतो, विविध वस्तू, कागदपत्र, परीक्षेच्या उत्तरपत्रिका आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बारकोडचा वापर होतो.