जीवावर उदार होऊन मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत; कर्मचाऱ्यांना ऊर्जामंत्र्यांचा सलाम

Madhuvan

मुंबई – कळवा पडघा केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी जवळपास तीन ते चार तास मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक आणि इतर दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. याचाच एक व्हिडीओ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेअर करत कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.

नितीन राऊत म्हणाले कि, मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणाऱ्या चार मुख्य वाहिन्यापैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या वीज वाहिनीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम, असे ट्विट त्यांनी केले आहे. 

दरम्यान, मुंबईत सोमवारी सर्वत्र अचानक जो वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला त्यामागे घातपात असण्याची शक्‍यता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.  मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी एकाच वेळी वीज अचानक गायब होणे ही छोटी बाब नाही असेही ते म्हणाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.