ई-वे बिलांची निर्मिती वाढली

नवी दिल्ली – व्यापार व वाहतूक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये 4.87 कोटी ई-वे बिल्स काढण्यात आली. याअंतर्गत 13.85 लाख कोटी रुपयांच्या मालाची वाहतूक झाल्याचे जीएसटी नेटवर्कने म्हटले आहे.

आंतरराज्य मालवाहतूक करायची असल्यास 50,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वाहतुकीसाठी ई- वे बिल घ्यावे लागते. सध्या करदाते व वाहतूकदार पाच दिवसांच्या कालावधीसाठी ई-वे बिल घेऊ शकतात. हा कालावधी वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांना रोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत ई- वे बिल घेता येतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.