काठमांडू : लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या पाच दिवसांच्या नेपाळ दौऱ्याची आज सांगता झाली. आपल्या भेटीत लष्करप्रमुखांनी नेपाळच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाशी व्यापक प्रमाणावर चर्चा केली. नेपाळचे उच्च आदरणीय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, उच्च माननीय पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माननीय संरक्षण मंत्री मनबीर राय यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठका घेतल्या.
नेपाळच्या लष्कराचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी अर्थपूर्ण चर्चाही केली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळचे उच्च माननीय राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नेपाळी लष्कराचे मानद जनरल पद प्रदान केले. लष्करप्रमुखांनी शिवापुरी येथील नेपाळ आर्मी कमांड अँड स्टाफ महाविद्यालयात भावी नेतृत्वाचे प्रबोधन करताना “युद्धाचे बदलणारे स्वरूप” या विषयावर व्याख्यान दिले.
दोन्ही सैन्यांची क्षमता आणि कार्यक्षमता मजबूत आणि सखोल करण्याच्या उद्देशाने परस्पर सहभाग निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. लष्करप्रमुखांनी एका समारंभात तुंडीखेलच्या बीर स्मारक येथे नेपाळच्या शहीद शूरवीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी परस्पर हितसंबंध आणि मार्गांबाबत चर्चा केली. जनरल द्विवेदी यांनी नेपाळी लष्कराच्या लष्करप्रमुखांना भारत भेटीसाठी औपचारिक आमंत्रण दिले.