नगर – विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शुक्रवारी,13 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. याआधी निवडणूक आचारसंहितेच्या काळात सभा झाली होती. त्यामुळे या सभेत निर्णय घेता आले नाहीत. त्यामुळे या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या सभेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या आधी विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात सभा घेण्यात आली होती. या सभेत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. त्यानंतर साधारण अडीच महिन्यांनंतर सभा होणार आहे. जानेवारी महिन्यात नवीन अध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे या सभेस महत्व प्राप्त झाले आहे. या सभेत शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा यांसह अन्य विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
यावर चर्चा होणार आहे. प्रशासनाकडून सभेचे नियोजन केले जात आहे. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे पाठवणे, अनुपालन अहवाल तयार करणे, मागील सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांनी काय कार्यवाही केली याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे.