मॉस्को – रशियाचे आण्विक सुरक्षा दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोवव्ह आज राजधानी मॉस्कोमध्ये घराजवळ झालेल्या स्फोटात ठार झाले. रशियाच्या तपास कमिटीने ही माहीती दिली. ले.जन. किरिलोव्ह हे रशियाच्या आण्विक, जैविक आणि रासायनिक सुरक्षा दलाचे प्रमुख होते.
त्यांच्याव्यतिरिक्त त्यांचा सहायक देखील या स्फोटात ठार झाला. एका स्कूटरमध्ये बसवण्यात आलेल्या उपकरणाचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणी दोन जणांच्या मृत्यूचातपास रशियाच्या तपास कमिटीने सुरू केला आहे, असे या कमिटीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेन्को यांनी सांगितले.
तपासासाठी तपास कर्मचारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अन्य सुरक्षा दलांचे कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाच्या अनुषंगाने शोध आणि चौकशीही केली जात असल्याचेही या प्रवक्त्यांनी सांगितले. रशियाकडून ले.जन. किरिलोव्ह हे युक्रेनविरोधातल्या युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर करत असल्याचा आरोप युक्रेनने कालच केला होता.
रशियाकडून रासायनिक अस्त्रांच्या वापराच्या ४,८०० घटनांची नोंद झाली असल्याचे युक्रेनने म्हटले होते. रशियाने प्रामुख्याने के-१ ग्रेनेडचा वापर केला आहे. गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेल्यायुद्धातरशियाला संथ गतीने पण ठाम यश मिळते आहे. युक्रेनच्या एक पंचमांश भूमीवर रशियाने यापूर्वीच ताबा मिळवला आहे.