मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे फॅन्स दीर्घकाळापासून तिच्या आगामी ‘गहराइयां’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. ‘गहराइयां’ सिनेमा येत्या 11 फेबु्रवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.
नुकतंच, या सिनेमाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, यामध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ हा एक रिलेशनशिप ड्रामा आहे. आजच्या जगातील तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
‘गहराइयां’ मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे सर्व लीड रोल मध्ये असणार आहेत. त्यासोबतच धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दीपिका आपल्या चुलत बहिणीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झालेली दिसते. ट्रेलरमध्ये दीपिका, अनन्या व सिद्धांतचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळतो. दीपिका व सिद्धार्थचे अनेक बोल्ड लव्ह मेकिंग सीन्स ट्रेलरमध्ये आहेत.
आणि त्यांचे हेच बोल्ड सीन्स पाहून फॅन्स सैराट झाले आहेत. सोशल मीडियावर सुद्धा फॅन्स त्यांच्या ये केमेट्री बद्दल वेगवेळ्या कमेंट करत आहेत. दरम्यान, आता दीपिका, अनन्या व सिद्धांतचा लव्ह ट्रँगला प्रेक्षकवर्ग कितपत पसंती देतो हे पाहणे गरजेचे आहे.