उपमहापौरपदी आनंदा देवमाने
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. महापौरपदी गीता सुतार, तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने यांची बहुमताने निवड करण्यात आली. महापौरपदाच्या निवडीत सुतार यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांचा, तर उपमहापौरपदाच्या निवडीत देवमाने यांनी योगेंद्र थोरात यांचा आठ मतांनी पराभव केला. महापौर, उपमहापौर निवडीत बरेच नाट्यमय घटना घडल्या होत्या.
महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून सुतार तर उपमहापौरपदासाठी देवमाने यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. तर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून महापौरपदासाठी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर, राष्ट्रवादीच्या मालन हुलवान तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसचे मनोज सरगर व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडे 41 व 2 सहयोगी सदस्य असे मिळून 43 संख्याबळ आहे
फोडाफोडीचे राजकारण करून महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपमधील सदस्य संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याडून या निवडीवर लक्ष ठेवून खबरदारी घेण्यात आली होती. भाजपमधील काणी सदस्य कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या गळाला लागूनये यासाठी भाजप नगरसेवकांना गोवा सहलीला पाठविण्यात आले होते. त्यांना गुरुवारी रात्री कोल्हापुरात तर तेथून शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवड सभेसाठी थेट सभागृहात आणण्यात आले.
यावेळी गुलाबपुष्प देऊन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता पहिल्यांदा महापौरपदाची निवड घेण्यात आली. महापौरपदासाठी दाखल झालेल्या सुतार, निंबाळकर व हुलवान यांच्या अर्जांची छाननी घेण्यात आली. यानंतर हुलवान यांनी माघार घेतली.त्यामुळे सुतार व निंबाळकर या दोघांच्यात लढत झाली. सुतार यांना 43, तर निंबाळकर यांना कॉंग्रेसची 20 तर राष्ट्रवादीची 15 अशी 35 मते मिळाली.
मुळे सुतार यांना आठ मतांची चढाई मिळाल्याने त्या विजयी झाल्या. उप महापौरपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरगर यांनी माघार घेतली. त्यामुळे आनंदा देवमाने व योगेंद्र थोरात यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये देवमाने यांना 43 तर थोरात यांना 35 मते मिळाली. आठ मतांनी भाजपचे आनंदा देवमाने हे उपमहापौर म्हणून निवडून आले. यावेळी सांगली आणि मिरजेत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.