गीता गोपीनाथ सोडणार आयएमएफची जबाबदारी

वॉशिंग्टन  – आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागार गीता गोपीनाथ यांनी आपली ही जबाबदारी सोडून हार्वर्ड विद्यापीठात काम करायचे ठरवले आहे. जानेवारी महिन्यात आपण आयएमएफच्या जबाबदारीतून मुक्‍त होणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

49 वर्षीय गीता या जानेवारी 2019 मध्ये आयएमएफमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रूजू झाल्या होत्या. आयएमएफच्या संचालिका क्रिस्टीना जॉर्जीएव्हा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे अप्रत्यक्षरीत्या नमूद करताना म्हटले आहे की त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्‍तीची निवड करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

गीता गोपीनाथ यांनी या संस्थेत अत्यंत भरीव योगदान दिल्याचे कौतुगोद्‌गारही त्यांनी काढले. गीता यांनी आपल्या कार्याचा ठसा येथे उमटवला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मूळच्या कर्नाटकातील म्हैसूरूच्या असलेल्या गीता गोपीनाथ या आयएमएफ संस्थेवर निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला मुख्य आर्थिक सल्लागार होत्या.त्यांनी कोविडच्या काळात या संस्थेत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.