जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचा शेअर बाजारावर होणारा परिणाम (भाग-१)

गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेची नेहमी चर्चा होत असते. पण जीडीपी नक्की असते तरी काय, याचा अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, जीडीपी आणि अर्थव्यवस्था यांच्यामुळे शेअर बाजाराच्या गतीवर व वाढीवर थेट परिणाम होतो का?

सध्या भारताचा जीडीपी ६.६ टक्के आहे. या वेगाने भारतीय अर्थव्यवस्था वाढत असल्याने जगातील इतर सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा हा वेग सर्वात जास्त आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र (सर्व्हिस सेक्टर) – ट्रेड, हॉटेल्स, वाहतूक, दूरसंचार, वित्तीय, विमा, रिअल इस्टेट, व्यावसायिक क्षेत्र, सामाजिक, सामुदायिक व व्यक्तिगत सेवा इत्यादी विविध प्रकारच्या क्षेत्रात सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी होत आहे. एकूण जीडीपीच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्तीचा भाग हा सेवा क्षेत्रातून येत आहे, शेती क्षेत्रातून १२ टक्के, उत्पादन क्षेत्रातून १५ टक्के, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रातून ८ टक्के, खणन, वीजनिर्मिती, वायू, पाणीपुरवठा इत्यादी क्षेत्रांमधून उर्वरीत पाच टक्के जीडीपीमध्ये योगदान असते.

जीडीपीची आकडेवारी दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध केली जाते यामुळे देशांतर्गत झालेल्या उत्पादनांची व सेवांची नेमकी किती वाढ झाली किंवा घट झाली याचा परामर्श घेतला जातो.

कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वाढले किंवा घटण्याच्या सरासरीवरून जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिक आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जीडीपीचा दर वधारला असेल तर  आर्थिक विकासाचा दर उंचावत आहे असे म्हणता येईल आणि जर दर घसरला आला असेल तर देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे, असा निष्कर्ष निघतो.

जीडीपीचा दर कसा ठरवला जातो?

जीडीपी दोन पद्धतीने निश्चित केला जातो. कारण चलनवाढीमुळे उत्पादनखर्चात घट होते. हे प्रमाण कॉन्सटन्ट प्राईस (स्थिर मूल्य) अर्थात आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचे मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनांसाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरते. म्हणजेच वर्ष २०१० प्रमाण मानल्यास त्या आधारे उत्पादनाच्या मूल्यात किती वाढ किंवा घट होताना दिसते याचे चित्र समोर येते.

दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राईस म्हणजेच सध्याचे मूल्य. सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो.  याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो.

जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचा शेअर बाजारावर होणारा परिणाम (भाग-२)

केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनांसाठी एक वर्ष निश्चित केले जाते. त्या वर्षातील किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीच्या किंमतींचे परिक्षण केले जाते. त्या आधारे तुलनात्मक वाढ किंवा घट याची गणना केली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.