मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. मराठी अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
‘तुला पाहते रे’ मालिकेत गायत्रीने साकारलेली ईशा निमकर ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली. तिची बोलण्याची पद्धत तीचे काही डायलॉग आजही जसेच्या तसे लोकांना आठवतात.
दरम्यान, आता पुन्हा एकदा गायत्री आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. झी युवा या वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिऍलिटी शो मध्ये गायत्री झळकणार आहे. 11 डिसेंबरपासून हा कार्यक्रम झी युवा वाहिनीवर सुरु होणार आहे.