#SAG2019 : महिला एकेरीत ‘गायत्री आणि अश्मिता’चा अंतिम फेरीत प्रवेश

काठमांडू : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी तेराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेत आजही आपले वर्चस्व राखले. भारतीय महिला बॅडमिंटनपटू अश्मिता छलिहा आणि गायत्री गोपीचंद यांनी उपांत्य फेरीत सहज विजय मिळवित महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

अश्मिता छलिहाने उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या अचिनी रत्नासिराचा २१-०५, २१-०७ असा पराभव केला तर गायत्री गोपीचंदने श्रीलंकेच्याच की ही दिलमी डियास हिचा २१-१७, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

दरम्यान, गायत्री गोपीचंदने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या महूद शहझादवर २१-१५, २१-१६ असा, तर अग्रमानांकित अश्मिता छलिहाने पाकिस्तानच्या पलवशा बरशीवर २९-९, २१-७ असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.