Gautami Patil | Holi Look – कायमच संपूर्ण राज्यभर एका नावाची चर्चा चांगलीच होत असते. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. । Gautami Patil | Holi Look
गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. । Gautami Patil | Holi Look
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला चालू असतो. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण सध्या बनले असून, नेहमीच ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ हे नाव सर्वांच्या ओठावर असतं.
गौतमीने नुकतेच होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गौतमीने यात सफेद रंगाची ऑर्गेन्झा साडी परिधान केली आहे. या साडीला कॉन्ट्रास्ट म्हणून सीक्वेन्सच्या काळ्या रंगाच्या ब्लाऊजची निवड गौतमीने केली आहे.
रंगपंचमी साजरी करत या फोटोजमध्ये गौतमी रंगाने माखलेली दिसतेय. मोकळे केस, मोहक अदा आणि मिनिमल ज्वेलरीमध्ये गौतमीचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. होळीच्या सणानिमित्त गौतमीने शेअर केलेल्या या फोटोजमुळे चाहते घायाळ झाले असून, या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.