मुंबई : आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावणारी सबसे कातिल गौतमी पाटील नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत असते. तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतता. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. गौतमीची लोकप्रियता एवढी वाढली आहे कि ती आता एका सिनेमात झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
गौतमी पाटील आणि मराठी अभिनेता अमेय वाघचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून या गाण्याचं नाव ‘लिंबू फिरवंल’ आहे. ‘तिच्या डोळ्यात जादू काळी, ती मंतर फुंकरणार..ती आलीये, आता सगळ्यांवर लिंबू फिरवणार..’ असे गाण्याचे बोल आहेत. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं आहे. यामध्ये गौतमी पाटील अमेय वाघसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
18 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात गौतमी पहिल्यांदा एक आयटम साँग करताना दिसणार आहे. या सिनेमात अमेय वाघबरोबरच अभिनेत्री जुई भागवत आणि अमृता खानविलकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.