पुणे : पुस्तक महोत्वसात नृत्यांगणा गौतमी पाटील यांनीही पुस्तके खरेदी केली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची “फकिरा’ कादंबरीसह अन्य दोन पुस्तके भेट दिली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजेश पांडे उपस्थित होते. राज्यातील अनेक भागात आजवर डान्स शोसाठी जात आहे. मला प्रत्येक ठिकाणी नाचण्यास बोलावले गेले.
पण, पहिल्यांदा पुस्तक वाचण्यास बोलवले आहे. आयुष्यात आज काही तरी वेगळ घडते आहे, याबद्दल मला खूप आनंद होत असे पाटील म्हणाल्या. कार्यक्रमामधून वेळ मिळेल. तेव्हा नक्कीच पुस्तक वाचेल, असेही त्या म्हणाल्या.