गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुढील चौकशीसाठी नवलखा यांची आणखी 10 दिवसांची कोठडीही मंजूर केली.

या खटल्यातील आरोपी व मानवी हक्‍क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएकडून आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे.

करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खटल्याबाबत अधिक तपास करता आला नाही. अटकेपासून 90 दिवसांच्या कालावधीत एनआयए आरोपपत्र दाखल करण्यास अपयशी ठरल्यामुळे जामिनासाठी नवलखा यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जांवर एनआयए विशेष न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.