कोरेगाव-भीमा हिंसाचार
मुंबई : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याने आणि या माओलवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असलेले गौतम नवलाखा यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज कालच फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम करताना नवलखा यांना 11 नोव्हेबर पर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.
दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो कालच (12 नोव्हेबरला) फेटाळण्यात आला. यामुळे केव्हाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी तातडीने आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर उद्या न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.