सेक्‍स वर्करच्या मुलांसाठी गौतम गंभीरचा पुढाकार

नवी दिल्ली – करोनाच्या संकटात रोजच्या जेवणाची देखील भ्रांत असलेल्या सेक्‍स वर्करच्या मुलांना मदत करण्यासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर याने पुढाकार घेतला आहे.

करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने अनेकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठीही खटाटोप करावा लागत आहे. देह विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या महिलांनाही याचा फटका बसला असून सर्वात भिषण हाल त्यांच्या मुलाबाळांचे होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी गंभीरने पंख ही मोहिम सुुरू केली आहे. या मुलांना जेवण तर पुरवलेच जात आहेच मात्र, त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्थाही गंभीरच्या सामाजिक संस्थेमार्फत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गंभीरने अशा 25 मुलांच्या शिक्षणाची व अन्य सुविधांची जबाबदारी घेतली आहे.

त्यांना या दलदलीतून बाहेर काढून राहण्यासाठीही तजवीज करण्यात येणार आहे. एक समाज म्हणून अनेक सुविचार सांगत असलेल्या आपल्या समाजात या मुलांच्या नशिबात अत्यंत हालाखीचे जीवन जगण्याची वेळ येते. तसेच त्यांच्याकडे नकोशा नजरेतून पाहण्यात येते हे अत्यंत गैर आहे, त्यामुळेच या मुलांच्या विकासासाठी तसेच प्रगतीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे गंभीरने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.