नवी दिल्ली – दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला 13 जानेवारीपर्यंत अध्यक्षांची नियुक्ती करावी लागणार आहे. या पदासाठी माजी कसोटीपटू गौतम गंभीर उत्सुक आहे, मात्र त्याला हे पद मिळवायचे असेल तर त्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.
गंभीरकडे हे पद देण्यात यावे यासाठी संघटनेतील जवळपास सगळे सदस्य इच्छुक आहेत. मात्र लोढा समितीच्या नियमांनुसार कोणत्याही राजकीय व्यक्तीस कोणत्याही क्रीडा संघटनेतील पद स्वीकारता येत नाही, त्यामुळे गंभीरला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. पत्रकार रजत शर्मा यांनी संघटनेतील बेबनावामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त आहे.