नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीमध्ये आपले महत्वाचे योगदान दिले आहे. गौतम गंभीर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याचे गुरुवारी जाहीर केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.
सध्या जगातील सर्वच देश कोरोनाशी मुकाबला करत आहेत. भारतातही कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. देशात आता कोरोना बाधितांची संख्या १९०० च्या पुढे गेली आहे. त्याचवेळी ५० रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
People ask what can their country do for them. The real question is what can you do for your country?
I am donating my 2 year’s salary to #PMCaresFund. You should come forward too! @narendramodi @JPNadda @BJP4Delhi #IndiaFightsCorona
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 2, 2020
गौतम गंभीर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोक विचारतात की त्यांच्या देशाने त्यांच्यासाठी काय केले. पण खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या देशासाठी काय केले. मी माझे दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला देतो आहे. तुम्ही सुद्धा पुढे आले पाहिजे.
गौतम गंभीर सोबतच क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, मिताली राज यांनीही कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपापली मदत जाहीर केली आहे.