‘इस पार दिल ने सब सरहदें मिटा दी’..गौतम गंभीरने पाकिस्तानी मुलीला केली मदत

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी एका पाकिस्तानी मुलील मदत केली आहे. पाकिस्तानविरूद्ध गंभीर नेहमी आक्रमक भूमिका घेताना पहायला मिळतात.

पाकिस्तानमधील एका कुटुंबाला त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचे होते. त्यांच्या मदतीसाठी गौतम गंभीर पुढे आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहले. गौतम गंभीर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे ती मुलगी व तिच्या कुटुंबीयांना उपचारासाठी व्हिसा देण्याची परवाणगी मागितली होती.

दरम्यान, संबधीत मुलीला व्हिसा मिळाल्यामुळे गौतम गंभीर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत. याचबरोबर त्यांनी एक कविता लिहून त्या मुलीचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.