नवी दिल्ली – करोनाविरुद्धच्या लढ्यात जगभरातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातही अनेक दाऩशूर व्यक्ती लाखो करोडो रुपयांची मदत करत आहेत. करोना विषाणूंच्या प्रभावाने संपूर्ण पृथ्वी व्यापली जाण्याचा धोका समोर असताना याची लागण झालेल्यांच्या उपचारांसाठी तसेच सरकारी यंत्रणांच्या प्रयत्नांना मदत म्हणुन जगभरातील क्रीडापटू आपला वाटा उचलत आहेत.
माजी कसोटीपटू व खासदार गौतम गंभीर याने प्रथम एक खेळाडू म्हणुन काही लाख रुपयांची मदत दिली होती. त्यानंतर त्याने आता आपल्या खासदार निधीतून पुन्हा 1 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला केली आहे. त्याच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीही 1 कोटी रुपये या निधीला दिले आहेत.