गौतम गंभीरकडे दोन वोटर आयडी

आपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नवी दिल्ली – पुर्व दिल्ली मतदार संघातील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याच्याकडे दोन निवडणूक ओळखपत्रे आहेत,दिल्लीतील मतदार यादीत त्याने स्वताचे नाव दोन वेळा नोंदवले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला असून त्यांनी त्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे गंभीर याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्याला अपात्र ठरवून त्याचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी त्यांची मागणी आहे. पुर्व दिल्ली मतदार संघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिशी यांनी गंभीर याच्या विरोधात ही तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की गौतम गंभीर याच्या नावावर दिल्लीत राजेंद्रनगर आणि करोल बाग या दोन ठिकाणी दोन मतदार ओळखपत्रे नोंदवली गेली आहेत. निवडणूक कायद्यानुसार हा गुन्हा असून त्यासाठी एक वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय देणार या विषयी औत्स्युक्‍यनिर्माण झाले आहे. या प्रकरणी गंभीर याने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.