Gautam Adani – गौतम अदानी हे आज जगातील 19 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, पण एकेकाळी त्यांच्याकडे काहीही नव्हते. उदरनिर्वाहाच्या शोधात वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ते रिकाम्या हाताने मुंबईला गेले, तिथे त्यांनी एका हिऱ्याच्या कंपनीत काम केले.
उद्योगपती गौतम अदानी यांनी सोमवारी अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या व्यावसायिक व्यवहारातून 10,000 रुपये कमिशन मिळवले होते आणि ही त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात होती. यशस्वी व्यावसायिक साम्राज्य निर्माण करण्याची कहाणी सांगण्याबरोबरच, अदानी असेही म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केल्याबद्दल त्यांना कधीकधी पश्चाताप होतो.
भावाला मदत करण्यासाठी गुजरातला परतले –
अदानी सांगतात, एका डायमंड कंपनीत काम करत असताना त्यांनी लवकरच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तीन वर्षांच्या आत त्यांनी मुंबईतील झवेरी बाजारमध्ये स्वत:चा हिरा ट्रेडिंग ब्रोकरेज सुरू केले. 1981 मध्ये गुजरातला परतले आणि मोठे भाऊ महासुखभाई यांना मदत करू लागले, त्यांनी अहमदाबादमध्ये एक छोटा PVC फिल्म कारखाना विकत घेतला होता. 1988 मध्ये अदानी एक्सपोर्ट्स नावाचा कमोडिटी ट्रेडिंग उपक्रम स्थापन केला आणि 1994 मध्ये सूचीबद्ध केला. आता या कंपनीचे नाव अदानी एंटरप्रायझेस आहे.
कॉलेजला गेलो असतो तर माझी क्षमता वाढली असती –
अदानी म्हणाले, बुद्धिमत्तेसाठी अनुभव घ्यावा पण ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यासही आवश्यक आहे. हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. अपयश आणि अडथळे तुमची परीक्षा घेतील. सामान्य आणि विलक्षण यशामधील फरक म्हणजे लढाण्याची तयारी, जी प्रत्येक वेळी उभे राहण्याचे धैर्य देते.