Gautam Adani Net Worth: सततच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (14 जानेवारी) काहीशी तेजी पाहायला मिळाली. यात सर्वाधिक फायदा अदानी ग्रुपच्या शेअर्सला झाल्याचे पाहायला मिळाले. अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमतीत एकाच दिवशी 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. विशेष म्हणजेच, एकाच दिवसात गौतम अदानींची कोट्यावधी रुपयांची कमाई झाली.
सोमवारी अदानींच्या संपत्तीत 5.06 अब्ज डॉलरची घट झाली होती. तर मंगळवारी एकाच दिवसात 7.47 अब्ज डॉलरची कमाई झाली. म्हणजेच, अदानींच्या संपत्ती एका दिवसात 61,192.09 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकदिवसआधी ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या टॉप-20 श्रीमंतचांच्या यादीतून बाहेर पडलेल्या अदानींची दुसऱ्याच दिवशी पुन्हा या यादीत एन्ट्री झाली.
त्यांची संपत्ती 7.47 अब्ज डॉलरने वाढून 73.5 अब्ज डॉलर झाली आहे. यासोबतच, जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते 22व्या स्थानावरून 20व्या स्थानावर पोहोचले. सध्या मुकेश अंबानींच्या संपत्ती 85.6 मिलियन डॉलरने वाढ झाले. ते 90.2 अब्ज डॉलर संपत्तीसह 17व्या स्थानावर आहेत.
एकाच दिवसात अदानीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये19.99 टक्के वाढ होऊन 519.85 रुपयांवर बंद झाला. तर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 13.52 टक्के, अदानी एंटरप्राइजेसमध्ये 7 टक्के, अदानी पोर्टमध्ये 5.25 टक्के आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअर्सच्या किंमतीत 12.23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या शेअर्सच्या किंमतीत एका दिवसात प्रचंड वृद्धी झाल्याने गौतम अदानी यांची संपत्तीही वाढली.