गौरी लंकेश यांच्या बहिणीने फेटाळला शुजाचा दावा

ईव्हीएम हॅकिंगचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत असल्याने हत्या झाल्याचा केला होता उल्लेख

बंगळूर: इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) हॅकिंगचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत असल्याने पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली, असा दावा सायबर तज्ञ सय्यद शुजाने केला आहे. मात्र, गौरी यांच्या भगिनी कविता लंकेश यांनी बुधवारी तो दावा फेटाळून लावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकास्थित शुजाने नुकतेच ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात विविध दावे करून मोठीच खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्याने गौरी यांचाही उल्लेख केला. मी गौरी यांची भेट घेतली होती. त्यांच्या साप्ताहिकात ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात लेख प्रसिद्ध व्हावा अशी माझी इच्छा होती. तसा लेख लिहिण्याच्या तयारीत त्या असल्याने त्यांची हत्या झाली, असे शुजाने म्हटले.

त्यामुळे गौरी यांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याच्या शक्‍यतेबाबत चर्चा सुरू झाली. अशातच पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना कविता यांनी शुजाचा दावा फेटाळून लावला. मला तो दावा पूर्ण खोटा वाटतो. शुजाने तसा उल्लेख का केला ते मला माहीत नाही. ईव्हीएम हॅकिंगच्या पर्दाफाशावरून गौरीची हत्या झाल्याचे मला वाटत नाही. गौरीच्या हत्येमागे राजकीय कारस्थान आहे. हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे कविता म्हणाल्या.

गौरी यांची 5 सप्टेंबर 2017 ला बंगळूरमधील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या गुन्हेगारी टोळीचा हात असल्याचा दावा बंगळूर पोलिसांनी केला आहे. त्या हत्या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन संशयितांच्या मागावर पोलीस आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)