वाई, (प्रतिनिधी)- येथील लोकविराज प्रतिष्ठानद्वारे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांतील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकविराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित या गौरी गणपती देखावा स्पर्धेमध्ये भरघोस बक्षीसे घोषित केली आहेत.
पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला स्कुटी, द्वितीय क्रमांकासाठी एक तोळ्याचा सोन्याचा हार, तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकासाठी फ्रीज, पाचव्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही अशा असंख्य बक्षीसांची लयलूट विजेत्यांना करता येणार आहे.
शिंदे म्हणाले, गेल्यावर्षी देखील महिलांसाठी घरगुती गौरी गणपती स्पर्धा आयोजित केली होती. गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण आणखी गोड करण्यासाठी तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम मोठं व्यासपीठ ठरला. गेल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर यावेळी खास लोकाग्रहास्तव या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी हमखास आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. कलागुणांना वाव देण्यासाठी हीच घरगुती गौरी गणपती डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक विराज शिंदे व माजी पंचायत समिती सदस्य ऋतुजा शिंदे यांनी केले आहे. ही स्पर्धा २० सप्टेंबरपर्यंत होणार असून यासाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.