झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

नवी दिल्ली – इंटरनेट आधारित अन्नपुरवठा सेवा देणाऱ्या झोमॅटो कंपनीचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. गेल्याच महिन्यामध्ये या कंपनीने यशस्वीरित्या प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओ जारी केला होता.

त्यामध्ये गौरव गुप्ता यांचा सिंहाचा वाटा होता असे समजले जाते. कंपनीला पाठविलेल्या ई – मेलमध्ये गुप्ता यांनी म्हटले आहे की, सहा वर्ष झोमॅटोमध्ये काम केल्यानंतर आता त्यांना एक नवीन प्रयोग सुरू करायचा आहे.

सध्या झोमॅटोचे व्यवस्थापन उत्तम आहे आणि हे व्यवस्थापन या कंपनीला आगामी काळात यशाकडे घेऊन जाईल. त्यामुळे मी माझा वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीत सहा वर्ष काम केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मूल्यवर्धन झाले आहे.

आपण या कंपनीवर सतत प्रेम करीत राहू. झोमॅटो कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपींदर गोयल यांनी गुप्ता यांच्या कंपनीतील कामाचे कौतुक करून आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.