मुंबई – पॉप सिंगर जस्टिन बीबर हा अशा स्टार्सपैकी एक आहे जो खूप कमी वयात प्रसिद्ध झाला होता. जस्टिन बीबरला आता परिचयाची गरज नाही. जस्टिन बीबर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. जस्टिन बीबर अनेकदा त्याची पत्नी हेली बीबरसोबतचे फोटो शेअर करत असतो.
अलीकडेच, हेली आणि जस्टिनने हिजाब मॉडर्न नावाच्या पेजसाठी इन्स्टाग्रामवर रोजे ( उपवास ) करण्याबद्दलचे त्यांचे विचार शेअर केले. त्यांनी (उपवास ) रोजेला मूर्खपणा म्हटले. दरम्यान, गौहर खान आणि तिचा नवरा जैद दरबार यांनी त्यांच्या रोजे ठेवण्याचा प्रवास त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला तसेच यावरून जस्टिन बीबरला फटकारले आहे.
जस्टिन आणि हेली बीबर एका मुलाखतीत म्हणाले की, ‘मी रोजेचा विचार मी ते कधीच केले नाही. मला वाटते की आपल्या शरीराला योग्य विचार करण्यासाठी पोषण आवश्यक आहे. त्यानंतर हेलीने खुलासा केला की मी खाणे थांबवत नाही रोजे माझ्यासाठी कधीही महत्त्वाचे नाही.’ जस्टिन आणि हेली बीबरच्या या वक्तव्यावर गौहर खानने तिची प्रतिक्रिया दिली आहे. गौहर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओ पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ते किती मूर्ख आहेत हे सिद्ध करते. त्यांना त्यामागील विज्ञानाची माहिती नसेल पण उपवासाचे आरोग्य फायदे आहेत. असं म्हणत गौहर खानने चांगलेच सुनावले आहे.