पुणे – रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत मळवली यार्ड येथील फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी (दि. 30) बंद ठेवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मळवली यार्ड (रेल्वे फाटक क्रमांक 36) येथील फाटक दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या बुधवारी (दि.30 डिसेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या कालावधीत बोरज गेट (रेल्वे फाटक क्रमांक 38) येथील रस्त्याचा वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.