गॅसचे दर 25 टक्‍क्‍यांनी होणार कमी

पुणे : चीनमध्ये करोना व्हायरस वाढल्यामुळे चीनसह इतर देशांतूनही मागणी कमी झाल्यामुळे नैसर्गीक वायूच्या किंमती कमी होणार आहेत. भारतामध्ये पुढील काही आठवड्यांत नैसर्गिक वायूच्या किंमतीत 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे गृहीत धरले जाऊ लागले आहे.
भारतामध्ये नैसर्गिक वायुची आयात करून त्याचा पुरवठा ओएनजीसी आणि ऑइल इंडिया या कंपन्या प्रामुख्याने करतात.

जागतिक पातळीवरील मागणी कमी झाल्यामुळे या नैसर्गिक वायूचे दर 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे नैसर्गिक वायूचे दर अडीच वर्षांच्या निचांकी पातळीवर जाणार आहेत. आयात वायू स्वस्त होणार असल्यामुळे देशात तयार झालेल्या गॅसच्या दरातही घट होणार आहे. या अगोदर 1 ऑक्‍टोबर रोजी नैसर्गिक वायूचे दर साडेबारा टक्‍क्‍यांनी कमी केले होते. आता गॅसच्या किंमती कमी होणार असल्यामुळे त्याचा फायदा केवळ स्वयंपाकाच्या गॅससाठी होणार नाही तर, खताचे दरही कमी होणार आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.