एप्रिल महिन्यात गॅसचे दर वाढण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – एप्रिलपासून गृहिणींचा ताळेबंद कोलमडण्याची शक्‍यता आहे. सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 18 टक्‍क्‍यांनी वाढवू शकते. नवे दर 1 एप्रिल 2019पासून लागू होणार आहेत. नव्या घरगुती गॅस धोरण 2014 अंतर्गत दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात. हा फॉर्म्युला परदेशी बाजारातल्या किमतीवर आधारित असतो.

सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरूपात वापरण्यात येणारा सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती वाढणार आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्‍त भार पडणार आहे. घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 18 टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे.

असे झाल्यास मॅन्युफॅक्‍चरिंग, ट्रॅव्हल आणि एनर्जी सेक्‍टरमध्ये महागाई वाढू शकते. भारतातल्या नैसर्गिक गॅसच्या किमती या गॅस वितरक देश असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार ठरत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.