नगर – पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात 19रुपयांची वाढ असून गेल्या वर्षभरात पाचव्यांदा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. नववर्ष स्वागताच्या तयारीत असलेल्या ग्राहकाचा या गॅस दरवाढीनेहिरमोड झाला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर 19 रुपयांनी महागला आहे.
नगर शहरामध्ये 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर आता 721.50 रुपये झाला असून घरगुती गॅससाठी 19 रुपये जादा मोजावे लागतील. मंगळवारपर्यंत गॅस सिलिंडर 702.50 रुपये या दराने उपलब्ध होत होता. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत27रुपयांची वाढ झाली आहे.1239 रुपयांना सिलिंडर आता 1266 रुपये झाला आहेः या दरवाढीने छोट्याव्यावसायिकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. गेल्या वर्षभरात सलग पाचव्यांचा सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदलाने इंधन आयातीच्या खर्चात वाढ होते. भारतीय चलनाचे गेल्या वर्षाच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत2.28 टक्के अवमूल्यन झाले.सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडरवर अनुदान दिले जाते.
मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर गरिबांना मोठ्या संख्येने वितरित केले आहेत. यामुळे मागील वर्षभरात एलपीजीचा खप 6 टक्क्याने वाढला आहे.