गॅस दरवाढीचा भडका…

मुंबई – जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका लागला आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विनासबसिडी एलपीजी सिलेंडर २५ रुपयांनी तर  सबसिडी सिलेंडर १ रुपया २३ पैशांनी महागला आहे. हे नवे दर आजपासून लागू करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडर दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

दिल्लीत आजपासून सबसिडी सिलेंडर ४९७. ३७ रुपयांना मिळेल तर मुंबईत ४९५.९ रुपयांना मिळेल, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय कच्चे तेल महाग झाल्याने आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.

दरम्यान, तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांमध्ये बदल करतात आणि या किंमती सरासरी बेंचमार्क किंमत आणि परदेशी व्यवहारांवर अवलंबून असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)