मुंबईत अनेक भागात गॅस गळती

मुंबई : मुंबईतील अनेक ठिकाणांहून गुरूवारी रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा अनेक ठिकाणांहून गॅस गळतीच्या तक्रारी समोर आल्या. दरम्यान, या भागातील नागरिकांनी याविषयीची माहिती अग्निशमन दलाला दिली. दरम्यान, या तक्रारींची दखल घेतल अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गॅस गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होत आहे याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातून गॅसचा दुर्गध येत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. संबंधित यंत्रणांना पालिकेने याबाबत माहिती दिली आहे. तसेच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या गॅस गळती कोणत्या ठिकाणाहून होत आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवल्या असून अधिक माहितीसाठी 1916 वर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु त्यामध्ये गळती झाली नसल्याचे ट्विटही पालिकेकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.