केडगाव पेट्रोलपंपावर गॅस गळती; अनर्थ टळला

नगर – एलपीजी गॅस रिक्षात भरताना गॅस गळती झाल्याची घटना केडगाव येथील देशमुख पेट्रोलपंपावर घडली. मात्र, वेळेवर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास देशमुख पेट्रोलपंपावर एका रिक्षामध्ये एलपीजी गॅस भरने चालू होते. त्यावेळी गॅस भरणारा कर्मचारी मोबाईलवर बोलण्यात दंग होता. असे आटल्याने त्याने रिक्षा सुरु करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गॅस भरणे चालू असल्याने रिक्षा पुढे गेली व पाईप सह गॅसमशिन ओढला गेला व गळती सुरु झाली. त्यामुळे गॅसचा फवारा 6 ते 7 फुट उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागास कळविले असता पथक हजर होवून गॅस चे कनेन्शन बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)